आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लाकडी फळी व सिमेंटची वीट डोक्यात मारणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

विधिसंघर्षित बालक ताब्यात : कोंढवा खुर्दमधील बधेनगरमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तूच स्वप्नील बधे आहे का, असे विचारून शिवीगाळ केली. लाकडी फळी व सिमेंटची वीट डोक्यात घालून जखमी करणाऱ्यास अटक केली असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना कोंढवा खु। येथील बधेनगर, राम मंदिराजवळ ३ जानेवारी २०२२ रोजी अडीचच्या सुमारास घडली.

अक्षय अशोक लोणारे (वय १९, रा. कोंढवा खुर्द, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी स्वप्नील बधे (वय ३२, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मोटारसायकलवरून घरी जात होते, त्यावेळी आरोपी आणि विधिसंघर्षित बालकाने थांबवून तूच स्वप्नील बधे आहे का, असे विचारून शिवीगाळ करीत, लाकडी फळी, सिमेंटची विट डोक्यात मारून जखमी केले. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले पुढील तपास करीत आहेत.

get_footer();