आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘लखोबा लोखंडे’ फेसबुक पेजचा ॲडमिन अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021
Spread the love

सायबर पोलिसांची कारवाई : पकडल्यास 100 कोटींचं बक्षीस देण्याचे केले होते चॅलेंज

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असं चॅलेंज देणाऱ्या लखोबा लोखंडे या फेसबुक पेजचा ॲडमिन असलेल्या अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी सांगली येथून शनिवारी त्याला ताब्यात घेतलं.

लिमये याला पुणे येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळं फासलं. तसेच त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतलं.
दरम्यान कष्टाने ज्या नेत्यांनी आपली कारकीर्द घडवली त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अशाच प्रकारे समाचार घेणार, असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

get_footer();