आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत कोयत्याने वार करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 5, 2022
Spread the love

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : तळजाई वसाहत येथील साई चौकात घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार करणाऱ्यांवर सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पद्मावती येथील तळजाई वसाहत येथे ३ मे २०२२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.
पद्मावती येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पद्मावती येथील तळजाई वसाहत येथे ३ मे २०२२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास भेळवाल्याच्या दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्यानी मारहाण करून गंभीर जखमी केले. सहकारनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. पठाण पुढील तपास करीत आहेत.

get_footer();