आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लक्ष्मीनगरमध्ये दुचाक्या पेटविणाऱ्या अज्ञातावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 10, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांत फिर्याद : एक लाख ९० हजार रुपयांचे नुकसान

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लक्ष्मीनगरमधील (येरवडा) सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकींना आग लावून पेटवून देणाऱ्या अज्ञातावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत चार दुचाकीचे 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी अमित दिगंबरराव सिंधीकुमटे (वय 30, रा. देवी अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या राहत्या बिल्डिंगचे पार्किंगमध्ये त्यांची व इतरांच्या दुचाकी पार्क केल्या होत्या. अज्ञाताने फिर्यादीच्या दुचाकीला आग लावली. या आगीत त्यांच्या दुचाकीबरोबरच इतर 3 दुचाकी जळून खाक होऊन 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले. आग लावण्यामागील कारणे अद्याप उघड झाले नसून सहायक पोलीस फौजदार सुर्वे तपास करीत आहेत.

get_footer();