आवृत्ती पुणे
← Back to Homepage

माय माऊली केअर सेंटरमध्येमध्ये लायन्स क्लबचा स्नेहमेळावा

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • November 1, 2022
Spread the love

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : दि. ३० तारखेला सकाळी कात्रज-कोंढवा रोड येथे माय माऊली केअर सेंटरमध्ये लायन्स क्लब 3234 डिस्ट्रिक्टच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भल्या सकाळीच  हिंदी-मराठी, जुन्या-नव्या गाण्याची मैफिल यासाठी जिल्हाभरातून लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती व त्यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे मैफिल अधिकच रंगतदार होत गेली. 
यावेळी लायन्स क्लबच्या वतीने माय माऊली केअर सेंटरमधील वृद्ध आजी-आजोबांच्या मदतीसाठी म्हणून कमर्शियल वॉशिंग मशीन तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन भेट देण्यात आले. तसेच विविध लायन्स क्लब व वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश कोठावदे, पी डी जी राज मुच्छाल, पी डी जी बी एल जोशी, श्रेयस दीक्षित,पुनीत कोठारी, विजय सारडा, रवींद्र गोलार, अनिल झोपे, नीरा आनंद, सुकेतू शहा,सुनील सुखात्मे, दिलीपसिंह मोहिते पाटील, टिळेकर, निलजकर, कदम,  पगार यांच्यासह विविध लायन्स क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी व माय माऊली केअर सेंटर चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील, विकास मुंदडा, विशाल वरुडे पाटील, निर्मला मुंदडा, संगीता वरुडे पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन तर देणगीदार दाते यांना आभारपत्र व सन्मानचिन्ह देऊन आणि नव्याने नोंदणी झालेल्या सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रांतपाल लायन राजेश कोठावदे यांनी ला. वरुडे पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करताना त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच माय माऊली केअर सेंटरच्या पाठीशी लायन्स क्लब कायम राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोन चेअर पर्सन ला विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी माय माऊली केअर सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तसेच आवश्यक वस्तू भेट दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनरवींद्र गोलार यांनी तर आभार माय माऊली केअर सेंटरचे सल्लागार राज मूच्छाल यांनी मानले.

get_footer();