आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोखंडी कोयत्याने वार करणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 5, 2021
Spread the love

पुणे-सोलापूर महामार्ग कवडीपाट टोलनाका येथील ड्रीम सिटीमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट-गोसावीवस्ती येथील ड्रीम सिटी बिल्डिंगमधील सिक्युरिटी गार्डला चोरट्याने कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २ नोव्हेंबर, २०२१) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

राज रवी पवार (वय २२), संकेत गायकवाड (वय २२, दोघे रा. गुजरवस्ती, कवडीपाट, हडपसर) आणि सुमीत साळवे (वय २२, रा. गोसावीवस्ती, कवडीपाट, हडपसर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये २८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पुणे-सोलापूर महामार्ग येथील ड्रीम सिटीमध्ये स्टील चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सिक्युरिटी गार्ड निवृत्ती मोरे आणि सुपरवायझर शरद कोंडुसकर यांना कोयता व लोखंडी रॉडने जखमी केले. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात पुढील तपास करीत आहेत.

get_footer();