आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोखंडी कोयता व रॉडने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 1, 2022
Spread the love

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : तळजाई वसाहतीमधील डाळिंब चौकात घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : म्हसोबा चौकात पाच जणांच्या टोळके उभ्या केलेल्या गाड्यांचे नुकसान करीत होते. त्यावेळी माझ्याकडे काय बघतोस म्हणून पाठलाग करून लोखंडी कोयता व रॉडने मारहाण करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पद्मावती येथील तळजाई वसाहतीमधील डाळिंब चौकात ३० जानेवारी २०२२ रोजी साडेसातच्या सुमारास घडली होती.

सोहान अजय तेजी (वय १६, रा. इंदिरा गांधी सोसायटी, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अजय तेजी (वय ४४, रा. पद्मावती, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पाच अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा मुलगा सोहान अजय तेजी त्यांच्या बहणीचा मुलगा दोघेजण म्हसोबा चौक येथे उभे होते. त्यावेळी तेथील पाच-सहाजणांचे टोळके हातात लोखंडी कोयता व रॉड घेऊन तेथे उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड करीत होते. त्यावेळी सोहान यास तू आमच्याकडे काय बघतोस असे म्हणून त्यांचा डाळिंब चौकापर्यंत पाठलाग करून लोखंडी कोयता व रॉडने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युनूस मुलांनी पुढील तपास करीत आहेत.

get_footer();