आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोणी काळभोर पोलिसांकडील तडीपार सराईत जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 11, 2022
Spread the love

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : धारदार शस्त्रे जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील तडीपार सराईतास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. आरोपीकडून धारदारशस्त्रे जप्त केली. पुढील तपासाठी आरोपीला चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सौरभ गोविंद इंगळे (वय २२, रा. इराणी मशीद, पठारेवस्ती, लोणी काळभोर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे दरोडा व वाहनचोर विरोधी पथक-२ चंदननगरमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील तडीपार रिव्हर डेल सोसायटी, खराडी येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार मनोज खरपुडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून त्याला पकडले. त्याच्यावर चंदननगर पोलीस स्टेशन आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीस चंदननगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, मनोज खरपुडे, मुकुंद पवार, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();