आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 13, 2022
Spread the love

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा : एसआरपीएफच्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

विक्रम सुरेश सोनवणे (रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बसविलेल्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दौंड एस आरपीएफ ग्रुप ७ चे अधिकारी दत्तात्रय भोंगळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १९ या अहमदनगरमधील कुसडगाव येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया २०१९ चा विक्रम सोनवणे हा उमेदवार होता. ही परीक्षा १२ डिसेंबर २०२१ रोजी कसबा पेठेतील आरसीएम गुजराथी कॉलेज येथे घेण्यात आली. या लेखी परीक्षेला विक्रम सोनवणे याने आपल्या जागी डमी उमेदवाराला बसविले होते. सोनवणे या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

त्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात सोनवणे याने डमी उमेदवार बसवून लेखी परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर भोंगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

get_footer();