आवृत्ती पुणे
← Back to Homepage

17 वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणार्‍यास ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 7, 2022
Spread the love

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : मोबाईलवर मेसेज पाठवून साधली जवळीक

महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क

पुणे : मोबाईलवर मेसेज पाठवून जवळीक साधून १७ वर्षाच्या युवतीला मारहाण करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मे २०२० ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडली.

रोहन गौतम निकाळजे (वय २२, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे. याप्रकरणी युवतीच्या वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, रोहन निकाळजे याने फिर्यादी यांची १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून तिच्याशी जवळीक साधली. तिचा पाठलाग करुन वारंवार फोन केला. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिला असताना आरोपीने तिला मारहाण करुन शिवीगाळ करुन जबरदस्तीने शरीरसंबंध केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

get_footer();