आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नीला शोधणार्‍या पतीला चोर समजून बेदम मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021
Spread the love

चांदणी चौकातील घटना : लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पाय केले फ्रॅक्चर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भांडण झाल्याने घरातून निघून गेलेल्या पत्नीचा शोध घेत असताना तिघा जणांनी पतीला चोर समजून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पाय फ्रॅक्चर केल्याची धक्कादायक घटना चांदणी चौकाजवळील रोडवर घडली.

याप्रकरणी पाषाण गावात राहणार्‍या एका २७ वर्षाच्या व्यक्तीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद (३५९/२१) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वैभव विष्णु हरपुडे (वय २२, रा. कर्वे रोड), विलासकुमार मिश्रा (वय २७, रा. मुळशी रोड) आणि श्रावणकुमार नरेश भूमिया (वय २६, रा. मुळशी रोड) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे त्यांची पत्नी घरातून निघून गेली होती. फिर्यादी हे तिचा शोध घेत मंगळवारी पहाटे पावणे दोन वाजता चांदणी चौकाजवळील शोभा निसारा सोसायटीसमोरील रस्त्यावर आले होते. यावेळी तिघांनी त्यांना चोर समजून शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या उजव्या पायाचे घोट्याजवळ फ्रॅक्चर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

get_footer();