आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गांजा विक्रीसाठी बाळगणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 7, 2022
Spread the love

अंमली पदार्थविरोधी पथक-१ची कारवाई : ३३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेबोल्हाई रस्ता येथे छापा टाकून गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-१च्या पथकाने अटक केली. आरोपीकडून १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजासह ३३ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कैलास साहेबराव पवार (वय ३५, रा. गडदेवस्ती, डोंगरगाव, पेरणे, वाडेबोल्हाई रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगरगाव-पेरणे येथील वाडेबोल्हाई रस्ता येथे राहत्या घरात विक्रीसाठी गांजा बाळगल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार अंमली पदार्थविरोधी पथक-१च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला. त्यावेळी घरामध्ये व घरासमोर उभ्या केलेल्या टोयोटा कारमध्ये १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा २५ लाख ७५ हजार ३०० रुपये, रोख ५० हजार ६०० रुपये, १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ७० हजार रुपये किमतीची करोला कार असा एकूण ३३ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोध पथक-१चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, विशाल दळवी, मारुती पारधी, राहुल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();