आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

खडक पोलिसांत गुन्हा : चार वर्षांपासून त्रास देत असल्याने दिली फिर्याद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : एकतर्फी प्रेमातून एका महिलेचा सातत्याने पाठलाग करुन तिने विरोध करताच तिला भर रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गेल्या चार वर्षापासून १७ फेब्रुवारीपर्यंत कैलास कांबळे हा या महिलेला त्रास देत होता.

कैलास ऊर्फ राजू बजरंग कांबळे (वय ५०, रा. पी एम सी कॉलनी, महात्मा फुले पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पद्मावती येथे राहणार्‍या एका ३७ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा वारंवार फिर्यादीचा पाठलाग करुन त्यांना नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. त्या बाहेर जात असताना त्यांचा रस्ता अडवून तू कोठे चालली आहे. मी तुझ्यासोबत येऊ का असे विचारत. फिर्यादी यांनी नकार देऊन त्या पुढे निघून गेल्या तरी तो पाठलाग करुन तू मला खूप आवडतेस, आपण फिरायला जाऊ, असे बोलत असे. फिर्यादी या गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता गंज पेठेतील स्वामी समर्थ मठाजवळून जात असताना कैलास कांबळे यांनी त्यांचा रस्ता अडविला. त्यांना तो मी तुझ्याबरोबर येऊ का़ तु मला खूप आवडतेस असे बोलू लागला. तेव्हा फिर्यादीने आई व भावाला फोन लावते, असे सांगितले. त्यावेळी आरोपीने तु फोन लावून तर बघ. तुला एकतर्फी प्रेमातून मारुन टाकतो व दोघाचे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी कैलास कांबळे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के तपास करीत आहेत.

get_footer();