आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेला मारहाण करीत विनयभंग करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 2, 2022
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : आरोपींनी पत्राच्या शेडमधील सामान काढून जाळले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पत्र्याच्या शेडची तोडफोड करुन व अश्लील शिवीगाळ करुन महिलेला आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण करत विनयभंग करणाऱ्या सातजणांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 मध्ये घडला.

सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 50 वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रीकांत दोडमणी आणि त्यांच्या इतर पाच ते सहा जणांविरुद्ध पीडित महिलेने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी शुक्रवारी (दि.31 मार्च) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी यांचा प्लॉट शेजारी शेजारी आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आणि त्याच्या इतर साथिदारांनी जागेच्या कारणावरुन महिलेच्या पत्र्याच्या शेडची तोडफोड करत असताना पीडित महिलेने आणि त्यांच्या मुलाने याबाबत आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी महिलेला आणि त्यांच्या मुलाला अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन महिलेचा विनयभंग केला.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पत्र्याच्या शेडमधील सामान बाहेर आणून जाळले. तसेच महिलेचे संसार उपयोगी साहित्य जबरदस्तीने टेम्पोत भरुन घेऊन निघून गेले.
आरोपींनी 65 हजार रुपयांचे सामान जबदस्तीने घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

get_footer();