आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेला वडापाव पडला आठ लाखांना

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 27, 2021
Spread the love

कारमधील दागिन्यांच्या पर्सची चोरी : सहकारनगरमधील अहिल्यादेवी चौकातील घटना

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

मोटारीतून जाताना वडापाव खाण्याची तलफ एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स मोटारीत ठेवून वडापाव आणण्यासाठी गेल्याची संधी साधून चोरट्याने कारमधील दागिन्याची पर्स चोरून नेली. ही घटना २४ ऑगस्टला संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास सहकारनगरमधील अहिल्यादेवी चौकात घडली.

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सहकानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला सहकानगरमध्ये राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी त्या मोटारीतून घराकडे चालल्या होत्या. त्यावेळी धनकवडीतील अमृततुल्य दुकानासमोर महिला वडापाव घेण्यासाठी थांबल्या होत्या. मोटारीतील डाव्या सीटवर त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स ठेवून त्या वडापाव आणण्यासाठी गेल्या. त्याचवेळी चोरट्यांनी संधी साधून कारमधील दागिन्याची पर्स चोरून नेली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

महिला वडापाव घेण्यासाठी उतरली असता, चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारून दागिन्यांसह रोकड चोरून नेली. वडापाव घेऊन आल्यानंतर महिलेला मोटारीत पर्स दिसली नाही. त्यामुळे त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे तपास करीत आहेत.

get_footer();