आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 6, 2022
Spread the love

9 जणांची निर्दोष मुक्तता : कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कुख्यात गुंड आप्पा लोंढे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, गोरख कानकाटे याच्यासह 9 जणांची सबळ पुराव्या अभावी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिरसेकर यांनी शिक्षा सुनावली.

आप्पा लोंढे याचा उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता.

आरोपी संतोष भीमराव शिंदे (वय 34, रा. शिंदवणे), निलेश खंडू सोलनकर (वय 30, रा. डाळिंब दत्तवाडी), राजेंद्र विजय गायकवाड (वय 24, रा. शिंदवणे), आकाश सुनिल महाडीक (वय 20), विष्णू यशवंत जाधव (वय 37, रा. माळवाडी, सोरतापवाडी), नागेश लखन झाडकर (वय 27, रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

न्यायालयाने आप्पा लोंढे प्रकरणातील नितीन महादेव मोगल (वय 27) मनी कुमार चंद्रा उर्फ आण्णा (वय – 45 रा. येरवडा पुणे, मुळ रा. रामपूर आंध्र प्रदेश) विकास प्रभाकर यादव (वय – 31 रा. उरुळी कांचन), गोरख बबन कानकाटे (रा. केरेगाव मुळ रा. इमानदारवस्ती ता. हवेली), आण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी (रा. मेमाणेवाडी ता. दौंड), प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन, सोमनाथ काळूराम कांचन, रविंद्र शंकर गायकवाड (रा. उरुळी कांचन) प्रविण मारुती कुंजीर (रा. वळती, ता. हवेली) यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

या खटल्याचा गुरूवारी (दि.5) जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरात मोठी दहशत होती. 1990 पासून गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या आप्पा लोंढेवर खून, खुनाचा प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यासारखे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईदेखील करण्यात आली होती. तर चार गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. 2002 मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. आप्पा लोंढे खुन प्रकरणातील आरोपी गोरख कानकाटे याची निर्दोष सुटका झाली असली तरी विलास लोंढे खून प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

get_footer();