आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मैत्रिणीवरुन कोयत्याने हल्ला करणारे अकराजण जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 11, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगावात दोन गटात राडा!

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मैत्रिणीवरून दोन गटामध्ये कोयत्याने मारामारी करणाऱ्या अकराजणांना अटक केली. तेथील एक टेम्पो व दुचाकीचे नुकसान करुन दहशत पसरविली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश धनाजी शिळीमकर, अमित थोपटे, अक्षय शिळीमकर, गणेश दसवडकर, स्वप्निल घारे, निखील कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विशाल बालाजी सोमवंशी (वय २१, रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा भाऊ विनोद सोमवंशी व आदेश शिळीमकर यांच्यामध्ये त्यांच्या मैत्रिणीवरुन भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन ते भांडण मिटविण्यासाठी आरोपींनी रविवारी रात्री फिर्यादी व त्यांच्या भावाला हनुमाननगरमधील शिवशाही चौकात बोलावले होते. तेथे अमित थोपटे याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. आदेश शिळीमकर याने कोयत्याने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन जखमी केले.

याविरोधात आदेश धनाजी शिळीमकर (वय २३, रा. वेताळनगर, आंबेगाव) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी विनोद बालाजी सोमवंशी, विशाल सोमवंशी, आकाश उणेचा, सजित पवार, पृथ्वीराज कांबळे, गोविंद लोखंडे, राम वाडेकर, योगेश थोरात, आकाश कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश उणेचा आणि सजित पवार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यासह पृथ्वीराज कांबळे, योगेश थोरात, आकाश कांबळे यांना अटक केली आहे.

get_footer();