आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मानलेल्या मामाचा १३ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 25, 2022
Spread the love

कोथरूड पोलिसांत फिर्याद : मुलगी झोपेतून दचकून उठल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

पुणे : तेरा वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाविरुद्ध कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०२१ मध्ये घडला असून, बुधवारी (दि. २३ मार्च २०२२) उघडकीस आला आहे.

कोथरुड परिसरातील ३४ वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अप्पर इंदिरानगर येथे राहणाऱ्या आरोपीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महिला सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस म्हणाल्या की, आरोपी हा फिर्यादी महिलेचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे त्याचे फिर्यादी यांच्या घरी येणे जाणे होते. मे २०२१ मध्ये फिर्यादी व त्यांचे पती सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांची मुलगी घरामध्ये होते. मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीने मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. तसेच व्हिडीओ काढला. याबाबत कोणाकडे वाच्यता केली तर आई-वडिलांना मारुन टाकण्याची धमकी मुलीला दिली. आरोपीच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत आई-वडिलांना काहीच सांगितले नाही. मात्र, मंगळवारी मुलगी झोपेतून दचकून उठली. तिच्या वडिलांनी तिला विचारले असता, तिने तिच्याबाबतीत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडित मुलीच्या आईने बुधवारी कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दिली.

आरोपीला अद्याप अटक केली नसून आरोपीचा शोध घेत असल्याचे तपास अधिकारी महिला सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस यांनी सांगितले.

get_footer();