आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कामासंबंधी चर्चा करताना झाली किरकोळ मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कामासंबंधी चर्चा करताना किरकोळ मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. यासीन जुग दर्ग्याजवळ सॅलीसबरी पार्क येथे २७ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला.

रुतिक संजय मोहोळ (वय २१, रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे), शादाब सलाउद्दीन इनामदार (वय २५), मौला अब्दुलरहिम शेख (वय २५, दोघे रा. मार्केटयार्ड, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी फैजल शेख (वय २२, रा. पुणे) यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यासीन जुग दर्ग्याजवळ सॅलीसबरी पार्क येथे कॅफेमधील कामगार आयान याचेसमवेत चर्चा करीत होते. त्यावेळी शाब्दिक चकमक होऊन किरकोळ मारहाणीचा प्रकार घडला. त्यावेळी फिर्यादीला आरोपीने मारहाण करत कोयता काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न करून पेपर स्प्रे फवारून डोळ्याला इजा करण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल रसाळ पुढील तपास करीत आहेत.

get_footer();