आवृत्ती पुणे
← Back to Homepage

व्यायामाला जाणाऱ्यास मारहाण करून लुटले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 14, 2021
Spread the love

हडपसर-ग्लायडिंग सेंटरजवळील घटना : हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

व्यायामाला जात असताना दगडाने व हाताने मारहाण करून चार हजार रुपये लुटून नेणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना ग्लायडिंग सेंटर येथील डीमार्टजवळ ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती.


गणेश गौतम कोरडे (वय २१, रा. सिद्धीविनायक पेट्रोल पंपासमोर, शेवाळेवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी किसोर केमदारने (वय २७, रा. हडपसर) याने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व्यायाम करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात दगडाने व हाताने मारहाण करून पाकिटासह चार हजार रुपये जबरदस्ताने काढून घेतले. पोलिसांनी आरोपीचा तपास करून अटक केली असून, पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.

get_footer();