आवृत्ती पुणे
← Back to Homepage

MBBS ला प्रवेशाच्या बहाण्याने 13 जणांना 2.53 कोटींला गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 9, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांत फिर्याद : विमाननगर-अहमदनगर दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : नाशिक येथील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 जणांना तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार विमाननगर येथील प्लॅटिनम बिल्डिंग आणि नाशिक येथील गंगापूर येथे घडला.

राजेंद्र कुशवाह, चंद्रशेखर देशमुख, पारस शर्मा व त्यांच्या इतर साथीदारावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नेवासा फाटा (जि. अहमदनगर) येथील पालकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या मुलाला नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोठ्यातून एमबीबीएसला प्रवेश देतो असे एजंटने सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करुन आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 30 लाख 72 हजार रुपये घेतले. याशिवाय आणखी 12 जणांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घतली. पैसे घेऊन मुलाला प्रवेश मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी पुणे पोलिसांकडे धाव घेत आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. आरोपींनी 13 जणांना 2 कोटी 53 लाखांचा गंडा घातला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे करीत आहेत.

get_footer();