आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मिलिंद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 4, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांत फिर्याद : धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्येश्वर मंदिर येथील दर्गाच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असताना व तेथे काम सुरु नसताना काम सुरु असल्याचे सांगून महाआरती करुन दिशाभूल करणारी पत्रके वाटून दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह फरासखाना पोलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी पवळे चौकात सर्वांनी एकत्र येऊन तेथे महाआरती केली. तसेच सोशल मीडियावर दिशाभूल करणार्‍या पोस्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सुनिल सदाशिव तांबट (वय ५३, रा. कसबा पेठ), स्वप्नील अरुण नाईक (वय ३६, रा. गुरुवार पेठ) मुकुंंद मारुतीराव पाटोळे (वय ६२, रा. मंगळवार पेठ), मिलिंद रमाकांत एकबोटे (वय ६५, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), नंदकिशोर रमाकांत एकबोटे (वय ६०, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), योगेश भालचंद्र वाडेकर (वय ४१, रा. शुक्रवार पेठ), कुणाल सोमेश्वर कांबळे (वय ३९, रा. नवी सांगवी), रवींद्र राजेंद्र ननावरे (वय ३३, रा. पर्वती दर्शन), संतोष कमलाकर अनगोळकर (वय ४४, रा. धनकवडी), धारुदत्त वसंत शिंदे (वय ५२, रा. सहकारनगर), धनंजय मारुती गायकवाड (वय ५१, रा. सदाशिव पेठ), प्रशांत प्रकाश कांबळे (वय २४, रा. मंगळवार पेठ), देवीसिंग मोहनसिंग दशाना (वय १८, रा. कसबा पेठ), विकी रमेश चव्हाण (वय २५, रा. कसबा पेठ), आदित्य ज्ञानेश्वर कांबळे (वय १८, रा. कसबा पेठ), विश्वजीत ज्ञानदेव भिसे (वय २३, रा. हमालनगर, मार्केटयार्ड), आकाश प्रभाकर माने (वय १९, रा. चव्हाणनगर, पद्मावती), पार्थ जय प्रकाश पांचाळ (वय २१, रा. नर्‍हे), आदित्य संतोष राजपूत (वय १८, रा. पद्मावती) आणि वैभव वाघ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे व नंदकिशोर एकबोटे, वैभव वाघ वगळता इतरांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी विविध समाजमाध्यमांवर सुनियोजितरित्या कट रचून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ होणारे मजकूर असलेले संदेश, व्हिडिओ व निमंत्रण पत्रिका या सोशल मीडियावर प्रसारीत करुन सर्व हिंदु धर्मीय लोकांना आवाहन केले. त्यांना पवळे चौकात एकत्र जमवले. तेथे महाआरती केली.

पोलीस सहआयुक्त यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला. तसेच कार्यक्रमस्थळी वाटप केलेल्या पुस्तिकेमध्ये येथील विवादित ठिकाणी न्यायालयाची स्थगिती असून कोणत्याही प्रकारचे बांधकाम चालू नसताना तेथे काम चालू असल्याबाबत दिशाभूल व दोन समाजामध्ये तेढ, द्वेष निर्माण व्हावा, या उद्देशाने मजकूर छापलेला आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी भेट दिली
असून, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

get_footer();