आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 9, 2022
Spread the love

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हातातील मोबाईल चोरून नेला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. विजय सेल्स, पुणे स्टेशन येथे ३० जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोबाईल चोरीची घटना घडली होती.

एलिसन विल्सन पिल्ले (वय २०, रा. घोरपडीगाव, पुणे), तेजस गुलाब बाटे (वय २७, रा. सिंहगड रोड, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहेत. याप्रकरणी रवींद्र पावारा (वय २०, रा. स्वारगेट, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विजय सेल्स, पुणे येथून पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी दुचाकीवरून जवळ येत त्यांच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला होता. ही घटना ३० जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विजय सेल्स, पुणे स्टेशन येथे घडली होती. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();