आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुकबधिरांनीच केली 570 मूकबधिरांची फसवणूक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022
Spread the love

पुण्यातील धक्कादायक प्रकार : आरोपींना येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दोन महिन्यात रक्कम दामदुप्पट करुन देण्याच्या आमिषाने 570 मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या सहा मूकबधिरांची येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे. याप्रकरणात आरोपींनी ज्यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा अधिकचे पैसे दिले आहेत त्यांनी अतिरिक्त रक्कम पोलिसांकडे जमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुयोग सुधिर मेहता (वय-23 रा. रायकरनगर, धायरी), अभिझर सौफउद्दीन घोडनदीवाला (वय-32 रा. साळुंखे विहार, पुणे), प्रदिप महारुद्र कोलते (वय-29 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), चंचल सुयोग मेहता (वय-32 रा. रायकरनगर, धायरी), मिहिर संतोष गोखले (वय-35 रा. सदाशिव पेठ, पुणे), धनंजय सुदामराव जगताप (वय-35 रा. कात्रज पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हर्षल शांताराम पिंजण (वय-40 रा. देहुरोड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सध्या येरवडा जेलमध्ये आहेत.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. तपासादरम्यान आरोपींनी सुयो अँड अभि एन्टप्रायजेस व प्लॅटिनियम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स ग्लोबल सोल्युशन नावाने कंपन्या स्थापन केल्या. कंपन्यांचे बँक खात्यामध्ये तसेच स्वत:च्या खात्यात वेगवेगळ्या राज्यातील मुकबधिर व अंध लोकांकडून कोट्यावधी रुपये जमा केले. त्यामध्ये काही रक्कम त्यांनी फॉरेक्स ट्रेडिंगकरिता वापरुन काही रक्कम वैयक्तिक खर्चाकरीता वापरली. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या मुकबधिर लोकांना दुप्पट परतवा देण्यासाठी काही रक्कम वापरली. सुरुवातीला आरोपींनी अनेक मुकबधिर गुंतवणूकदारांना व मित्र, नातेवाईक यांना जास्तीची रक्कम दिल्याचे बँक स्टेटमेंटवरुन निष्पन्न झाले आहे.

डिमांड ड्राफ्ट पुणे पोलिसांमर्फत पुणे जिल्हा न्यायाधिश यांच्याकडे जमा केले आहेत. आतापर्यंत 12 लाख 27 हजार एवढी रक्कम जमा झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूकदारांना आवाहन केले आहे की, या गुन्ह्यामध्ये आरोपींकडून ज्या व्यक्ती, गुंतवणूकदार यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. त्यांनी ती रक्कम या खात्यात डिमांड ड्राफ्ट द्वारे जमा करावी. ज्यामुळे नुकसान झालेल्या मुकबधिर गुंतवणूकदार यांना त्यांची रक्कम परत मिळेल.

जे गुंतवणूकदार त्यांना मिळालेली अतिरिक्त रक्कम जमा करणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

get_footer();