आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोटारसायकल आडवी घालून कोयत्याच्या धाकाने लुबाडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 19, 2021
Spread the love

हडपसर पोलिसांत दिली फिर्याद : उरुळी देवाची कचरा डेपोजवळ घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोंढव्यातून ड्युटी संपवून घरी जात असताना कामगाराला तिघांनी मोटारसायकल आडवी घालून कोयत्याच्या धाकाने लुबाडले. ही घटना उरुळी देवाची फाट्याजवळ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री एकच्या सुमारास घडली.

किरण लोणकर (वय २८, रा. वकडी पवार मळा, ता. हवेली, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कोंढवा येथील कंपनीतून ड्यूटी संपवून घरी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवरून आले आणि फिर्यादीच्या दुचाकीला मोटर सायकल आडवी लावून कोयत्याच्या धाकाने मोबाईल आणि पाचशे रुपये रोख, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे एटीएम कार्ड हिसकावून घेत पळून गेले. तसेच पळून जाताना जीवे मारण्याची धमकी दिली.

पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

get_footer();