आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 9, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक : जम्पोटेल टेक्नॉलॉजी कंपनीतून झाली होती चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : होलसेल किराणा मालाची विक्री करणाऱ्या लोणीकंद येथील जम्बोटेल टेक्नॉलॉजी कंपनीचे 43 लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात रोखपाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन लोणीकंद पोलिसांनी अवघ्या चार दिवसात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पुष्कर निनाद संगमनेरकर (वय – 29 रा. रास्तापेठ, पुणे) असे अटक केलेल्या रोखपालाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, कंपनीचे 43 लाख रुपये चोरून पळून गेलेला आरोपी पुष्कर संगमनेरकर हा गोवा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, पोलीस कर्मचारी अजित फरांदे, अमोल ढोणे यांनी गोवा येथून आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 41 लाख 400 रुपये जप्त केले आहेत.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, कैलास साळुंके, विनायक साळवे, सुधीर अहिवळे, सागर शेडगे, बाळासाहेब तनपुरे, मोहन वाळके, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();