आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर टाकणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 13, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांची कारवाई : लग्नाच्या आमिषाने मागून घेतले नग्नावस्थेतील फोटो

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावरील ओळखीतून लग्नाच्या आमिषाने १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास सांगितले़ ते फोटो ग्रुपवर टाकून बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला.

अमोल महादेव बोरकर (वय २६, रा. बोरकर वस्ती, भावडी, ता़ हवेली) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार सोन्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी यांच्या १६ वर्षाच्या मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. अमोल बोरकर याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. तिला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास सांगितले मुलीने त्यास नकार दिला. तेव्हा सोन्या नावाच्या मुलाने तुझी गावात बदनामी करेल, अशी धमकी दिल्याने या मुलीने त्यास इन्स्टाग्रामवर तिचे नग्न अवस्थेतील फोटो पाठविले. तेव्हा अमोल बोरकर याने हे फोटो एका ग्रुपवर टाकून तिची बदनामी केली. लोणीकंद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

get_footer();