आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुलीला त्रास दिल्याच्या कारणावरून मारहाण केलेल्या तरुणाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 19, 2022
Spread the love

शिवणेमध्ये घडली होती घटना : वारजे पोलिसांनी चौघांना केली अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुलीला त्रास दिल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील शिवणे परिसरात घडली असून पोलिसांनी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रद्युन्य प्रकाश कांबळे (वय २२, रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शिवणे परिसरातील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडेन्सीमधील वंदना नावाच्या महिलेने आपल्या मुलीला त्रास देतो म्हणून घरात कोंडून दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. बुधवारी संध्याकाळी प्रद्युन्य कांबळे हा मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्यावेळी मुलीच्या आईने घरात का आलास? असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर प्रद्युन्य कांबळे याला घरात कोंडून बेदम मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर प्रद्युन्य कांबळे हा तिथून निसटून पळाला असता त्याचा पाठलाग करुन दांगट पाटील नगर रोडवर त्याला दोन तरुणांच्या मदतीने मारहाण केली. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी गेले त्यावेळी तरुणाला मारहाण करुन दोनजण रिक्षामधून पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. प्रद्युन्य प्रकाश कांबळे याला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युन्य प्रकाश कांबळे हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

get_footer();