आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रीय पातळीवरील रौप्यपदक नानवीज-दौंड केंद्राने पटकावले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 18, 2021
Spread the love

प्राचार्य रामचंद्र केंडे यांनी केले अभिनंदन : नवी दिल्लीतील स्कोट ग्रुप संस्थेने पुरस्कार केला जाहीर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नवी दिल्ली येथील स्कोच ग्रुप संस्थेद्वारे २०२१ चे ७६ वे स्कोच अवार्ड मंगळवारी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) रोजी जाहीर झाले आहे. त्यामध्ये नानवीज-दौंड या प्रशिक्षण केंद्राला पोलीस अँड सेफ्टी प्रकारातील इम्प्रुव्हमेंट इन परफॉर्मन्स बाय इम्प्रुव्हिंग क्वालिटी ऑफ ट्रेनिंग यामध्ये उत्कृष्ठ कामगिरीसाठी राष्ट्रीय पातळीवरील रौप्य पदकाने गौरविण्यात आले आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्राचार्य संदीप आटोळे यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीजमधील नाविन्यपूर्ण उपक्रम व गुणवत्तापूर्वक प्रशिक्षणाबाबत प्रस्ताव तयार करून दिल्ली येथील स्कॉच ग्रुप या संस्थेला पाठविला होता.

तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातर्फे पोलीस निरीक्षक शंकर काळे यांच्या वतीने ऑनलाइन सादर करण्यात आला होता. पारितोषिक पटकाविण्यात पोलीस प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य संदीप आटोळे यांच्या नेतृत्वाखालीपोलीस निरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार दीपक संकपाळ व पोलीस शिपाई निलेश थोरात व अन्य अधिकारी-कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

नानवीज-दौंड पोलीस प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दूर ग्रामीण भागात असून तेथे सोयीसुविधांची कमतरता आहे. मात्र परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्राला दिले जाणारे द्वितीय पारितोषिक (सिल्व्हर मेडल) पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीजने प्रथम पटकाविल्याबद्दल प्रशिक्षण केंद्रातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे प्राचार्य रामचंद्र केंडे यांनी अभिनंदन केले.

get_footer();