आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नऊ लाखांची खंडणी स्वीकारताना गुन्हेगारास रंगेहाथ पकडून अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 12, 2021
Spread the love

खंडणी विरोधी पथक दोनची कामगिरी : बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज

पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारास नऊ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहरला यश मिळाले असून, सदर आरोपीविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार अनिकेत किशोर अहिवळे (रा. एल.आय.जी. कॉलनी, निगडी, पुणे) यांची आयटी कंपनी कोरोना लॉकडाऊनमुळे बंद पडली होती. त्यामुळे उदरनिर्वाहाकरिता तक्रारदार हे एस.बी.आय. बँकेचे लोन प्रोसेसिंग व कस्टमरचे लोन प्रोसेसिंगची कागदपत्रे बँकेज जमा करण्याचे काम करीत होते. वाल्मीकी तुपे यांनी तक्रारदार यांना लोन फाईल पूर्ण करुन देण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये दिले होते. परंतु लोन फाईलमध्ये त्रुटी असल्यामुळे सदरची लोन फाईल रिजेक्ट झाली. त्यामुळे तक्रारदार यांनी वाल्मीकी तुपे यांचेकडून लोन प्रोसेसिंग करिता घेतलेले ३ लाख ५० हजार रुपयांपैकी ७५ हजार रुपये परत केले होते आणि उर्वरीत पैसे थोडे थोडे करीत परत देत होते.


परंतु पोलीस अभिलेखावरील व नुकताच खुनाचे गुन्ह्यातून बाहेर आलेला गुन्हेगार तुषार बाळासाहेब बघे (रा. सिंहगडरोड, धायरी पुणे) याने तक्रारदार अनिकेत अहिवळे यांना फोन करून मी वाल्मीकी तुपेचा भाऊ आहे, वाल्मीकी तुपेचे जे पैसे तुझ्याकडे आहेत ते मला पाहिजे आहेत, नाहीतर तुझ्या घरातील सर्व साहित्य घेऊन जातो, तुझ्या घराला कुलूप लावतो, तुझ्या म्हाताऱ्या आईला बाहेर फेकून देतो, असे म्हणून तक्रारदार यांना वारंवार फोन करुन पैशाची मागणी करून ९ लाख रुपये मला द्यायचे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी तक्रार अर्ज केलेला होता.

सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांनी खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व पथकास सूचना व मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने आरोपी तुषार बाळासाहेब बधे (वय ३१, रा. सुयश अपार्टमेंट, सिंहगडरोड, धायरी, पुणे) यास गुरुवारी (९ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास डायमंड क्वीन हॉटेलच्या जवळ, कॅम्परोड, पुणे येथील सार्वजनिक रोडवर तक्रारदार यांचेकडून नऊ लाख रुपये स्वीकारत असताना खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याचेविरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, वरील आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.


सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२कडील पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार संपत अवचरे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, सौदाबा भोजराव, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर (सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा) यांनी केलेली आहे.

get_footer();