आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : माहेरहून सोन्याचे दागिने आणि पैसे आणण्यासाठी छळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : माहेरहून सोन्याचे दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पती आणि सासू यांना अटक केली आहे. हा प्रकार १८ जुलै २०२१ ते ६ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

राधिका विक्रांत बेगळे (वय २३, रा. पांडवनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विक्रांत सुनिल बेगळे आणि वर्षा सुनिल बेगळे (दोघे रा. जनसेवा सांस्कृतिक हॉलजवळ, पांडवनगर) यांना अटक केली असून, दीर विस्मय सुनील बेगळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वैशाली सुनिल सोनवणे (वय ४८, रा. हडपसर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राधिका हिचा विक्रांत बेगळे याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून
तिला माहेरहून पैसे आण. सोन्याचे दागिने आण, यासाठी सतत मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने ६ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे अधिक तपास करीत आहेत.

get_footer();