आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ओडिसातल्या आर्थिक गुन्ह्यातल्या आरोपीला मुंढव्यातून अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 31, 2023
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ओडिसा राज्यातल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने, मुंढवा पोलिसांच्या मदतीने आर्थिक गुन्ह्यातल्या आरोपी विशाल उतकर याला पुण्यातून अटक केली. प्रथमदर्शनी आरोपी ने क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची अफरातफर केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या आर्थिक गुन्ह्यांतर्गत भुवनेश्वरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक रीना बेहरा आणि त्यांचे पथक पुण्यात दाखल झाले होते. मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार तानाजी देशमुख, निलेश पालवे, माऊली गिरमकर, रविंद्र देवढे यांनी सहकार्य केले. या कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भुवनेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपआयुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शन आणि सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती पुणे पोलिसांची माहिती पत्रकाआधारे दिली आहे.

get_footer();