आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सातारा रोडवर पीएमपी बसमध्ये एक लाखाच्या दागिन्याची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : बालाजीनगर-अहिल्यादेवी चौक दरम्यान झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सातारा रोडवर पीएमपी बसमधून प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधील १ लाख रुपयाचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरुन नेले.

सहकारनगर पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या सातारा रोडवरील राव नर्सिग होम ते बालाजीनगर येथील अहिल्यादेवी चौक दरम्यान पीएमपी बसमधून प्रवास करीत होत्या.

प्रवासादरम्यान चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या खांद्यावरील पर्सची चैन अर्धवट उघडून पर्समध्ये ठेवलेले ५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरुन नेले.

सातारा रोड, नगर रोड, पुणे महापालिका येथून पिंपरीकडे जाणाऱ्या बस तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरट्यांची टोळी हेरुन त्यांच्याकडील पर्स तसेच अंगावरील दागिने चोरुन नेत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच बसथांब्यावर आणि बसमध्ये पोलिसांकडूनही भुरट्या चोरट्यांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे, असे मिलन यादव यांनी सांगितले.

get_footer();