आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ऑनलाईन कपड्याऐवजी आल्या पाच पोती चिंध्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 10, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांत फिर्याद : अंजनी टेक्सटाईल्सच्या मालकावर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ऑनलाईन कपड्याऐवजी व्यापाऱ्याला चिंध्या पाठवून फसवणूक करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 ते 29 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला.

याप्रकरणी रविवार पेठेतील एका 36 वर्षाच्या व्यापार्‍याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंजनी टेक्सटाईल्सचे मालक हितेश कुमार बाबुलाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी बाबुलाल यांनी कपडे विक्री करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याशी फोनवर संपर्क साधला.
त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांच्याकडून ऑर्डर घेतली. त्याचे 2 लाख 78 हजार 491 रुपये फिर्यादी यांनी त्यांच्या खात्यावर पाठवली. त्यांना ऑर्डरप्रमाणे कपड्यांचा माल न देता त्यांना 5 पोत्यांमध्ये कपड्याच्या फाटक्या चिंध्या पाठवून फिर्यादी यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मोकाशी पुढील तपास करीत आहेत.

get_footer();