आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पदपथावर झोपण्याच्या वादातून एकाचा खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 5, 2022
Spread the love

समर्थ पोलिसांत फिर्याद : नाना पेठेतील पदमजी चौकात घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

पुणे : पदपथावर झोपण्याच्या वादातून एकाने अनोळखी नागरिकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करणाऱ्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार नाना पेठेतील पदमजी चौकातील फुटपाथवर मंगळवारी (दि.3) मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

मोहित अमीर अंगीर (वय 30, रा. खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रिजवान शेख (वय – 41, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अंगीर व अनोळखी व्यक्ती दोघेही भिक्षेकरी असून फिरस्ते आहेत. पदमजी चौकाजवळील दुल्हा दुल्हन कब्रस्तानच्या भिंतीलगतच्या फुटपाथवर मोहित अंगीर हा झोपण्यासाठी आला होता. त्याच ठिकाणी एक जण झोपत असे. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने मोहित अंगीर याला तेथे झोपण्यास विरोध करुन शिवीगाळ केली. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात मोहित याने तेथे असलेला सिमेंटचा गट्टू त्याच्या डोक्यात मारला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.

पोलिसांनी मोहित अंगीर याला अटक केली आहे. खून झालेल्या फिरस्त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.

get_footer();