आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पहारेकऱ्याचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : काळेपडळ येथील गणेश विहार सोसायटीसमोरील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोसायटीच्या गेटवरील पहारेकऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. काळेपडळ येथील गणेश विहार सोसायटीच्या गेटसमोर रविवारी (दि. १६ जानेवारी २०२२) रात्री एकच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.

अनिल टमट्टा (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी काळेपडळ येथील सोसायटीच्या गेटवर पहारा देत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

get_footer();