आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बालाजीनगरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईताला अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 6, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-2ची कारवाई : आरोपीवर सात गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : बालाजीनगर परिसरात तरुणाला बेदम मारहाण करीत पाया पडायला लावणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट-2ने जेरबंद केले. आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी-कळस येथील हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी असे 7 गुन्हे दाखल आहे.

सल्ल्या उर्फ सलमान हनिफ शेख (वय-22 रा. रजनी कॉर्नर, बालाजी नगर, धनकवडी) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, सल्ल्या शेख याचे साथिदार सौरभ भगत, आदेश बिरामणी, सँडी उर्फ संदीप शेंडकर, आपान शेख, सुफीयान व त्याच्या तीन ते चार साथीदारांनी एका तरुणाला ‘तु पूर्वी आमच्या गँग सोबत राहत होता, आता का राहात नाही’ अशी धमकी देऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच, तरुणाला मारहाण करीत गुडघ्यावर बसवून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपान शेख याने हा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या घटनेनंतर आरोपींनी हातात तलवार, कोयते, लोखंडी सळई घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्याचेही चित्रीकरण करुन तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ समोर आल्यानंतर सहकारनगर पोलीस खडबडून जागे झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन काहींना अटक केली. आरोपींचा शोध घेत असताना मुख्य आरोपी सलमान शेख हा आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी-कळस येथील एका हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती युनिट-2च्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी सापळा रचून आरोपीचा शोध घेतला. पोलीस आल्याचे पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

get_footer();