आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पर्वतीमध्ये दहशत पसरविणाऱ्या सातजणांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 11, 2022
Spread the love

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : पूर्वीच्या भांडणाच्या रागातून केली मारामारी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आम्ही इथले भाई आहोत, आमच्यामध्ये कोणी आले, तर संपवून टाकू, अशी धमकी देत दहशत पसरविणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. पर्वती गाव येथील जनता वसाहतीमधील रस्त्यावर ९ मार्च २०२२ रोजी सायंकाली साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

जनता वसाहतीमधील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांचे मित्र मोटारसायकलवरून जनता वसाहत पर्वती येथून जात होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोटारसायकल आडवी घालून आम्हीच जनता वसाहतचे भाई असून, आम्हीच इथे राज्य करणार, आमच्या पोरांना कोयत्याने मारताय काय, तुम्हा आता खल्लास करून टाकतो, आता यांना सोडायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी कोयता व बांबूने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नागरिकांची गर्दी होताच लोखंडी कोयते व लाकडी बांबू दाखवून आमच्या बांडणामद्ये कोणी पडायचे नाही, आम्ही इथले भाई आहोत, आमच्यामध्ये कोणी आले, तर संपवून टाकू, अशी धमकी दिल्याने नागरिकांनी दारे-खिडक्या बंद करून घेतले. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();