आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत पसरविणाऱ्या टोळीतील आरोपींवर हडपसर पोलिसांकडून ¨मोक्का लागू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021
Spread the love

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न : पाच गंभीर गुन्ह्यात तिघांवर कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर तडीपार कालावधीत विनापरवाना येऊन फिर्यादीच्या गालावर व डोक्यात चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून परिसरात दहशत पसरविणारे टोळीतील आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सदर टोळीवर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मुंढव्यात राहणाऱ्या सोळा वर्षांच्या फिर्यादी एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याच्या मित्रास भेटण्याकरीता त्याच्या वडिलांचे मांजरी येथील गॅरेजवर गेला असता, दोन दुचाकींवर आलेल्या भैय्या पानसरे व त्याच्या इतर दोन अनोळखी मित्रांनी येऊन गाडी पुसायला कापड न दिल्याचे कारणावरून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गालावर, डोक्यावर चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मित्राचे वडील हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही चाकूने वार करून जखमी केले, म्हणून हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्ह्याचे तपासादरम्यान गुन्हयातील निष्पन्न व अटक आरोपी टोळी प्रमुख आणि पाहिजे असलेला आरोपी आकाश दादासाहेब भापकर (वय १९, रा. कवडीपाट हनुमान मंदिराजवळ लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे,) टोळी सदस्य योगिराज ऊर्फ भैय्या संदिप पानसरे (वय २१, रा. माळवाडी, हडपसर, पुणे,) अभिजित संजय सावंत, (वय २३, रा. शिवपार्क, बी/बिल्डींग, प्लॉट नं. २०३/२०४, पावर हाऊस, फुरसुंगी, पुणे) या आरोपींनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करून स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व रहावे म्हणून व अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा याकरीता केलेला असल्याचे तसेच यातील नमुद आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन व पुणे शहरातील इतर पोलीस स्टेशनला खंडणीची मागणी हत्यारासह गंभीर दुखापत करणे असे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत सदर आरोपी यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii) ३ (२) ३(४) चा (मोक्का) अंतर्भाव करणे बाबत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्या कार्यालयाकडे पाठविला असता त्यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) मंजुरी देण्यात आली आहे. त्यावरून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आलेली असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजु अडागळे, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, गोरख दरेकर, पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे, प्रशांत नरसाळे, बाबासाहेब शिंदे, गिरीश एकोर्गे (सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर) यांनी केली आहे.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुधद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्काअंतर्गत आतापर्यत ५४ कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

get_footer();