आवृत्ती पुणे
← Back to Homepage

परराज्यातील दोन अट्टल वाहनचोरांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 10, 2022
Spread the love

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ची कारवाई : पुण्यातील 11 दुचाकी जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१ने दोन परराज्यातील अट्टल वाहन चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पुण्यातून चोरलेली 11 वाहने जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई हिंगणे – सिंहगड येथे करण्यात आली.

गणेश हुच्चापा गुडळी (रा. गुडळी, ता. सिंदगी, कर्नाटक), रोहित राहुल काळे (रा. बंखलकी, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल वाहनचोरांची नावे आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी सिंहगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आरोपींनी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 5, दत्तवाडी 3, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक आणि इतर ठिकाणाहून दोन वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील अंमलदारांना सूत्रांकडून दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी गणेश गुडळी हिंगणे – सिंहगड या ठिकाणी वाहन चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने आरोपींनी पुणे शहरातून चोरलेली 1 लाख 64 हजार रुपये किमतीची 11 दुचाकी वाहने जप्त केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ गजानन टोम्पे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, निलेश शिवतरे, सुमित ताकपेरे, चंद्रकांत जाधव, ऋषिकेश कोळप, गणेश पाटोळ, नारायण बनकर, अक्षय गायकवाड, शिवाजी सातपुते, महिला पोलीस अंमलदार डोंगरे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();