आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या मॉलच्या मॅनेजरवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 14, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : शरीर संबंधास नकार देताच कामावरून काढून टाकले

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : रिपोर्टिंगला आलेल्या महिलेकडे एकटक पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करुन शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढव्यातील मॉलच्या मॅनेजरवर कोंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.

प्रशांत मोरे (वय ४०, कोंढवा) असे या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्रशांत मोरे हा कोंढवा परिसरातील एका मॉलमध्ये मॅनेजर आहे. त्याच्या ऑफिसमध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी फिर्यादी गेल्या. तेव्हा तो फिर्यादीकडे एकटक बघत असे. कारण नसताना त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास त्याने फिर्यादी यांना सांगितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्यांना कामावरुन काढून टाकले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.

get_footer();