आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पिस्टलसारख्या शस्त्राच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 26, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांची कामगिरी : ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पिस्टलसारख्या शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ३३ लाख ८ हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींना इंदौर, मध्यप्रदेश, झाशी, उत्तर प्रदेश येथून शोध घेऊन अटक केली.

विपीन द्वारकादास तिवारी (वय ३५, रा. इंदौर, मध्यप्रदेश), कपिल वीरसिंग यादव (वय २९, रा. झाशी, उत्तर प्रदेश) भूपेंद्र श्यामलाल राय (वय ३०, रा. बिना, मध्यप्रदेश), शैलेंद्रकुमार रामसेवक राय (वय ३१, रा. उरई, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मधुरम सत्यानारायण सोनी (वय २७, रा. गंगासिटी, नांदेड) यांनी फिर्याद दिली होती.

स्वारगेट येथील वेगा सेंटर येथे उतरल्यानंतर अँटीकरप्शनचे अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी विपीन द्वारकादास तिवारी यास चारचाकी वाहनात कोंबून पिस्टलच्या धाकाने रोख रक्कम लुटून हातापायाला तोंडाला चिकटटेप लावून अज्ञातस्थळी फेकून देऊन आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करून नांदेड ते पुणे टोलनाके तसेच शहरातील प्रमुख सीसीटीव्ही फुटेज तपासली असता आरोपी सराईत शरीफ मो सरवर शेख (रा. नांदेड) अनावश्यक फिरताना आढळला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपीचा सुगावा लागला. मात्र आरोपी लोकेशन बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. आठ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी इंदौर, मध्यप्रदेश, झाशी, उत्तर प्रदेश येथून शोध घेऊन अटक केली. आरोपीकडून रोख एक कोटी २५ लाख ५० हजार, तीन जिवंत गावठी पिस्टल ५० हजार रुपये, गावठी कट्टा पाच हजार रुपये, रॅम्पो सुरी तीन हजार रुपये, तीन चिकट टेप शंभर रुपये, एक चाकू ५०० रुपये, कटर ५० रुपये, दोन मेणबत्या ५० रुपये, १० रुपये फिक्कट निळ्या रंगाची पिशवी, १० लाख ७ हजार असा एकूण ३३ लाख ८ हजार ६६० रुपयांचा मु्ददेमाल हस्तगत केला.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस शिपाई सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, सचिन दळवी, दीपक खेंदाड, फिरोज शेख, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर बडे, लखन ढावरे, प्रवीण गोडसे, शैलेश वाबळे, ऋषिकेश तिटमे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();