आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘पिटा’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 27, 2021
Spread the love

हिंजवडीमधील लॉजवर छापा टाकून दोन मुलींची केली होती सुटका

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडी येथील क्लाऊड नाइन, ओयो लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करुन दोन मुलींची सुटका केली होती. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश सुर्यवंशी (रा. उदगीर, जि. लातूर) याला जामीन मंजुर करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. विकास बाबर यांनी दिली.

हिंजवडी भागातील क्लाऊड नाइन ओयो लॉजमध्ये छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करुन दोन मुलींची सुटका करुन मंगेश सुर्यवंशी याला अटक केली होती. तर लखन उर्फ सनी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश हा न्यायालयीन कोठडीत होता. आरोपीने अ‍ॅड. विकास बाबर, अ‍ॅड. विजय बाबर व अ‍ॅड. स्वप्निल जोशी यांच्या मार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.

न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून समाज विरोधी असल्याचे न्यायालयाला सांगतले. तर आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आपोरीचे वय लहान आहे. कोरोना महामारीमुळे कौटुंबिक जबाबदारी त्याच्यावर होती. यामुळे तो या हॉटेलमध्ये काम करत होता. यामध्ये त्याचा काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी मंगेश सुर्यवंशी याचा 25 हजार रुपयाच्या जातमुसलक्यावर जामीन मंजूर केला.

get_footer();