आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएमपी बसची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 30, 2021
Spread the love

थेरगावातील आठवण चौकातील घटना : वाकड पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद् गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 27) सकाळी सव्वासातच्या सुमारास थेरगाव येथील आठवण चौकात घडला आहे.


संतोष देवराम शिंदे (वय 48, रा. काळेवाडी, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत हनुमंत पांडुरंग पवार (वय 45, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीएमपीएमएल बसचालक संतोष दत्तात्रय पोळ (वय 38, रा. थेरगाव) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी पवार आणि मयत शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 सीएच 2616) थेरगाव येथील आठवण चौक येथून जात होते. रस्ता ओलांडत असताना इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसची पवार यांच्या दुचाकीला धडक लागल्याने अपघात झाला. या अपघातात शिंदे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, तर पवार गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

get_footer();