आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस दलातील वीरमरण आलेल्यांच्या स्मृतीला पोलीस दलाने वाहिली आदरांजली

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021
Spread the love

पोलीस दलातील वीरमरण आलेल्यांच्या स्मृतीला पोलीस दलाने वाहिली आदरांजली

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यासह देशभरामध्ये मागिल वर्षामध्ये पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीला आज (गुरुवार, दि. २१ ऑक्टोबर) पोलीस स्मृतिदिनी पोलीस दलाच्या वतीने पाषाण येथील सीआरपी येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यात आली.

पुण्यातील महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र येथे पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकावर जिल्हाप्रमुख व सत्र न्यायाधीश संजय देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त (कारागृह महासंचालक) अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) नामदेव चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत कुंभार, रघुनाथ खैरे, अनंत शिंदे, सुरेश खोपडे, रामराव वाघ, माधवराव चितळे, नारायण स्वामी, अनिल ढेरे, वसंत कोरेगावकर, अशोक चांदगुडे, अशोक जोग, भगवंतराव मोरे, एस. डी. पारधी, सुधाकर आंबेकर आदी अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग पोलीस, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ व २ मधील बँडपथकाने शोक कवायतीमध्ये सहभाग घेतला होता. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व सेकंड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांनी कवायतीचे नेतृत्व केले. यावेळी कर्तव्य बजावित असताना वीर प्रात झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस जवान अशा एकूण ३७७ जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आणि गजानन टोम्पे यांनी केले.
एसआरपीएफमधील सेवानिवृत्त सहायक पोलीस फौजदार सीताराम नरके आणि पोलीस हवालदार दत्तात्रय निकम यांनी सूत्रसंचालन केले.

get_footer();