आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 12, 2022
Spread the love

पुण्यातील गुन्हा मिटविण्यासाठी दिली जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाने त्याच्या राहत्या घरी एका महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सोलापूरमधील विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील जुना गुन्हा मिटवून घेण्यासाठी पोलीस निरीक्षकाने त्या महिलेला घरी बोलावून घेतले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवान माने (नेमणूक महिला प्रशिक्षण, केगाव, सध्या रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. चंद्रकांत माने यांच्यावर यापूर्वी पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन येथे 23 सप्टेंबर 2020 रोजी गु.रं.नं.1025/2020 गुन्हा दाखल झालेला आहे.

दरम्यान, फिर्यादी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रकांत माने यांनी त्यांच्या मधूबन सोसायटी, विजापूर रोड येथील घरी बोलावून घेतले. पीडित महिला घरी गेल्यानंतर माने यांनी तिला तू पुण्यात दाखल केलेला गुन्हा मिटवून घे, आपण पहिल्यासारखेच राहू असे म्हटले. त्यावेळी पीडित महिलेने हे प्रकरण न्यायालयात असून, जो निकाल लागेल तो लागेल असे सांगितले.

त्यावेळी पोलीस निरीक्षक माने यांनी पीडित महिलेला तु माझ्यावरील केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत महिलेला धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी आपले प्रकरण न्यायालयात सुरु आहे, तू मला लग्नाचे आमिष दाखवून फसवल आहेस, मी केस मागे घेणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस निरीक्षक माने याने फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने मोबाइल देण्यास नकार दिला. त्यानंतर माने यांनी महिलेचा हात पकडून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगीराज गायकवाड करीत आहेत.

get_footer();