आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा सुरू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 7, 2022
Spread the love

वाकड पोलिसांत फिर्याद : एक प्रकरण ताजे असतानाच दुसरा व्हीडिओ व्हायरल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोशल मीडियावर थेरगाव क्वीन नावाने अकाउंट तयार करुन शिव्या आणि धमक्या देत व्हीडिओ तयार करणाऱ्याची घटना ताजी असताना आणखी एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करत दहशत निर्माण करणाऱ्या ‘थेरगाव क्विन’ आणि तिच्या मित्रांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. हे प्रकरण ताजे असतानाच या तरुणीचा आणखी एक व्हीडीओ समोर आल्याने चांगली खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडलं असून, या तरुणीसह असणाऱ्या कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत असून, तुरुंगाबाहेर आल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. परंतु हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संगिता जिजाभाऊ गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी इन्स्टाग्रामवर या नावाने अकाउंट चालवणाऱ्या मुलीने त्याच्या सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरले. तसेच धमकीवजा व्हिडीओ तयार करुन ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

get_footer();