आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिसांना एक वर्षांपासून गुंगारा देणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021
Spread the love

युनिट-१ची कारवाई : पर्वती दर्शनमधील सराईत देत होता गुंगारा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

मागिल एक वर्षापासून पर्वती दर्शन परिसरातील सराईत गुंड एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास जेरबंद केले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी दुखापत, दरोड्याची तयारी, हत्यार बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे असे नऊ गुन्हे दत्तवाडी, सहकारनगर, स्वारगेट, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

महेश ऊर्फ मिट्या नवले असे अटक केलेल्याचे नाव आहे. आर्म अॅक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, युनिट-१चे पथक गुन्हे युनिट-१चे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त व गुन्हेगारांचा तपास करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजय थोरात, अजय पवार आणि इम्रान शेख यांना एक वर्षापासून फरार आरोपी धनकवडीतील यशवंतनगर येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने एक पिस्टल व एक जिवंत काडतूस घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याच्या घरातून पंचासमक्ष २१ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता, त्याच्यापासून भीती असल्याने पिस्टल बाळगल्याची माहिती दिली.

आर्थिक व सायबर गुन्हेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, राहुल मखरे, आय्यज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे व मीना पिंजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();