आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिसांना गुंगारा देणारा आर्थिक गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 4, 2022
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांची दमदार कामगिरी : कानपूर (उत्तर प्रदेश) येथून घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपीच्या कानपूर (उत्तर प्रदेश) येथून शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुभम दुर्गैस गौर (वय ३४) व त्याची पत्नी रंजना शुभम गौर (वय ३१, दोघे रा. किडवाईनगर, कानपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी शुभम गौर याने एनसीटी दिल्ली येथे एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सहायक आयुक्तपदाचे बनावट आयकार्ड दाखवून फिर्यादींना दारू विक्री परवाना देतो असे सांगून ४० लाख ४३ हजार रुपये घेतले. त्या बदल्यात मेसर्स सयुरी वाई अँड कंपनी नावाचे बनावट दारू विक्री परवान्याची कलर झेरॉक्स देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. तपासामध्ये आरोपी वारंवार राहण्याचा पत्ता बदलत होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांना आरोपीची सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानंतर कानपूर (उत्तर प्रदेश) येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेत आलिशान फोर्ड इंडिओव्हर कंपनीची मोटारकार, दोन मोबाईल फोन व लॅपटॉप असा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, महिला पोलीस निरीक्षक रेश्मा साळुंखे, पोलीस हवालदार गुंड, रुपेश वाघमारे, पोलीस शिपाई राऊत, पूनम बनकर यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली.

get_footer();