आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तीन महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022
Spread the love

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तीन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले. पुढील कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलसांच्या ताब्यात दिले.

सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण (वय २०, रा. सर्व्हे नं.५, अशरफनगर, वरचा कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्योती हॉटेल चौक येथे थांबल्याची महिती सूत्रांकडून दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक१चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस फौजदार शाहीद शेख, पोलीस नाईक गणेश पाटोळे, गणेश ढगे, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे व वाहनचोरी विरोधी पथक-१ यांच्या पथकाने ही दमदार कारवाई केली.


get_footer();